जमशेदपूर येथे मंदिरामध्ये येशूची प्रतिमा लावल्यामुळे तणाव !

हिंदुत्वनिष्ठ नेत्याने बैठक घेऊन जाणीव करून दिल्यावर प्रतिमा काढली !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील ‘एन्आय् टी ’ महाविद्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाची धाड !

अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या ‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या अंतर्गत या महाविद्यालयाचे कामकाज चालत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या कार्यालयावर यापूर्वीही धाड टाकली होती.

कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतलेल्यांच्या लोकलच्या प्रवासासाठी दोन दिवसांत निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

भाजपने याविषयी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘हा राजकारणाचा विषय नाही. नागरिक जसे समजून घेत आहेत, तसे राजकारण्यांनीही समजून घ्यावे.’’

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन

जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडावर चालू असलेले अतिक्रमण पहाता स्थानिक प्रशासन, राज्यशासन, पुरातत्व खाते आदी सर्वजण यांकडे डोळेझाक करत आहे.

पुणे येथे क्षुल्लक कारणावरून राष्ट्रीय महिला ज्युडो खेळाडूला मारहाण, मनसेकडून कारवाईची मागणी !

हडपसर परिसरातील सिग्नलवर वैष्णवीने कार हळू चालवण्याचा सल्ला दिल्यामुळे टिळेकर यांना राग आला आणि त्यांनी दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा हिंगोली येथे अपघात !

ताफ्यातील अग्नीशमनदलाच्या गाडीचे ‘ब्रेक फेल’ झाल्याने ती गाडी पुढील गाड्यांवर आदळली. यामध्ये ३ गाड्यांची किरकोळ हानी झाली.

अकोला येथे अपुर्‍या हानीभरपाईमुळे पूरग्रस्तांनी सानुग्रह निधीचे धनादेश प्रशासनाला परत केले !

सर्वाधिक हानी होऊनही अल्प रकमेचे धनादेश देण्यापेक्षा आवश्यक तितका निधी देणे आवश्यक आहे, ही साधी गोष्ट प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ?

कोरोनावरील २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मिळण्यासाठी मुंबईत भाजपकडून आंदोलन !

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

परीक्षा दिलेल्या ३०० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ते अनुपस्थित असल्याचा शेरा !

एक परीक्षाही सुरळीतपणे पार पाडू न शकणारे विद्यापीठ प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

माझ्या अखत्यारीतील कामे करण्याचा अधिकार राज्यघटनेने मला दिला आहे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापिठात चालू असलेल्या विविध उपक्रमांना भेटी देऊन त्यांचे कौतुक केले, तसेच ‘यापुढे विद्यापिठासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ’, असे आश्वासन त्यांनी दिले.