मुंबई – कोरोनाचे प्रतिबंधात्मक दोन डोस घेतलेल्या नागरिकांनी लोकलने प्रवास करावा का ?, यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय होऊ शकतो, असे संकेत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आपण प्रत्येक जिवाची काळजी घेत आहोत. लोकलच्या प्रवासाविषयी ३ दिवसांपासून चर्चा चालू आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केवळ लोकलच नाही, तर अन्य ठिकाणीही मुभा देऊ शकतो का ? याचा निर्णय पुढील दोन दिवसांत होईल.
भाजपने याविषयी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘हा राजकारणाचा विषय नाही. नागरिक जसे समजून घेत आहेत, तसे राजकारण्यांनीही समजून घ्यावे.’’