राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा हिंगोली येथे अपघात !

राज्यपाल सुरक्षित !

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील गाड्यांचा ६ ऑगस्ट या दिवशी सकाळी १०.३० वाजता हिंगोली येथे अपघात झाला. ताफ्यातील अग्नीशमनदलाच्या गाडीचे ‘ब्रेक फेल’ झाल्याने ती गाडी पुढील गाड्यांवर आदळली. यामध्ये ३ गाड्यांची किरकोळ हानी झाली.

राज्यपालांना कोणतीही दुखापत झालेली नाही, तसेच त्यांच्या वाहनालाही धक्का लागलेला नाही. अन्य कुणालाही या अपघातामध्ये गंभीर दुखापत झालेली नाही. हिंगोली येथे जिल्ह्यातील सोयी-सुविधा, सिंचन, पिण्याचे पाणी यांविषयीचा आढावा घेऊन राज्यपाल नरसी नामदेव येथे जात असतांना हा अपघात झाला.