कोरोना महामारीतही पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – दळणवळण बंदीमुळे केवळ अत्यावश्यक सेवा चालू असल्याचा अपलाभ घेऊन काही सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून लाच मागण्याचे प्रकार होत आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या ५ मासांमध्ये २१ सापळा रचून कारवाया झाल्या. त्यापैकी ८ कारवाया केवळ पुणे शहरात झाल्या आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील एक लेखपाल आणि २ अधिवक्त्यांचाही समावेश आहे. पोलीस विभागात ६, तर महसूल विभागात ३ कारवाया झाल्या. या सर्व कारवायांत ३० लाचखोरांना पकडण्यात आले. कोरोनाच्या पश्‍चात ‘फॉर्म’च्या छपाईचे देयक काढण्यासाठी जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला २० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.