सातारा – पाचगणी येथे लपून-छपून पर्यटक येत आहेत. पोलिसांना मुंबई ‘पासिंग’च्या ३ गाड्या आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने या पर्यटकांना ४ सहस्र रुपये दंड करत पाचगणी सोडण्यास सांगितले; मात्र तरीही हे पर्यटक पाचगणी येथील हॉटेल ब्रिकलँड येथे आल्याची माहिती नगरपालिका पथकाला मिळाली. (यावरून केवळ दंडाची कारवाई केल्याने नागरिकांवर वचक बसत नाही. नियम मोडणार्यांना कठोर शिक्षाच हवी, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक) पालिका पथकाने तातडीने हॉटेलवर धाव घेतली. तिथे त्यांना मुंबई ‘पासिंग’च्या ३ गाड्या आढळून आल्या. पथकाने तिन्ही गाड्यांवर प्रत्येकी २ सहस्र असा ६ सहस्र रुपये दंड वसूल केला आणि पाचगणी सोडण्याचे आदेश दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे नोंदवण्यात येतील, अशी चेतावणीही दिली.
….अन्यथा हॉटेलवरही कारवाई करणार ! – गिरीष दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी नगरपालिकादळणवळण बंदी असतांना पर्यटकांनी पाचगणीमध्ये प्रवेश करणे नियमबाह्य आहे. मुंबई येथील पर्यटक विनाअनुमतीपत्र पाचगणीमध्ये आले होते. त्यामुळे माहिती मिळताच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. हॉटेल व्यवस्थापनानेही कुठल्याही पर्यटकाला हॉटेलमध्ये ठेवून घेऊ नये. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. (मुळात आतापर्यंत पर्यंटकांना ठेवून घेतल्याप्रकरणी हॉटेलचालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी केल्यास चूक ते काय ? – संपादक) |