पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद !

पुसेगाव ते म्हासुर्णे रस्त्याचे काम करताना कर्मचारी

सातारा – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने येथील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६५ किलोमीटर रस्ता एका दिवसात निर्माण करत विश्‍वविक्रम केला आहे. या विश्‍वविक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

सौजन्य : सकाळ 

राजपथ इन्फाकॉनने हा रस्ता ३० मे या दिवशी सकाळी ७ वाजता चालू करून ३१ मे या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण केला. ३.५ मिटर रूंदीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे असा निर्माण झाला आहे. जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने आणि यंत्रांच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. कोरोनाचे नियम पाळत हे काम पूर्ण करण्यात आले.