मिरज – मिरज बेडग रस्त्यावरील पशूवधगृह बंद करण्याचा प्रशासनाने आदेश दिला असतांना येथे जनावरांची प्रतिदिन कत्तल चालूच आहे. अनुमाने ४० कामगार या ठिकाणी दळणवळण बंदीकाळातही उपस्थित असतात. (यावरून प्रशासन आणि पशूवधगृहचालक यांच्याकाहीरी साटेलोटे आहे, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी काही मासांपूर्वी शिवसैनिकांसह येथे धाड टाकली होती, तेव्हा आरोग्य अधिकार्यांनी पंचनामा करून पशूवधगृह बंद करू, असे सांगितले; मात्र तरीही परत तो चालूच आहे. महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. (असे असेल, तर कारवाई करण्याचे टाळणार्या प्रशासकीय अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक)