(म्हणे) ‘कोरोना जगात नाही, असे वाटत असल्याने मास्क काढून बोलत आहे !’ – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

‘जगात कोरोना नाही, असे वाटत असल्याने मी मास्क काढून बोलत आहे’, असे दायित्वशून्य वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

केरळमध्ये ख्रिस्ती संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’ला विरोध

विवाह करून पत्नीला घरी आणले आणि काही वेळातच तिला जिहादी आतंकवाद्यांना विकून टाकले, अशा आशयाचा एक व्हिडिओ केरळमधील ख्रिस्त्यांमध्ये सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे यांची लसीकरण नोंदणी थांबवली !

केंद्र सरकारने देशातील इतर गटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पहिल्या फळीतील कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला. सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना तसा आदेश दिला आहे.

विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार करूया ! – किरण दुसे, समन्वयक, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

गडावरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत…

संघर्षातून हिंदु धर्माचे पुनरुत्थान शक्य ! – बिनील सोमसुंदरम्, केरळ

केरळमधील शबरीमला मंदिराची परंपरा आणि पवित्रता भ्रष्ट करण्यासाठी हिंदुविरोधी, निधर्मी अन् राजकीय शक्ती यांनी आटोकाट प्रयत्न केले. आम्ही केवळ मूठभर भक्तांच्या साहाय्याने कायदेशीर लढा चालू केला.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबियांची घेतली भेट !

महिला आणि बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी ४ एप्रिल या दिवशी नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील मोरगाव येथे रहाणार्‍या दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली.

राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा !

लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.

संभाजीनगर येथे २ वर्षांत ४ सहस्र ९७ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला !

शहरात गेल्या २ वर्षांत ४ सहस्र ९७ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने काही दिवसांपासून नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

याला ‘लोकसंख्या जिहाद’ म्हणायचे का ?

जगात एकीकडे मोठे धर्म (ख्रिस्ती, हिंदु आदी) ११ ते ३५ टक्क्यांच्या गतीने वाढत आहेत, दुसरीकडे मुसलमानांची लोकसंख्या ७३ टक्क्यांनी म्हणजे सर्वाधिक गतीने वाढत आहे, असा अहवाल अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने दिला आहे.