चहा बनवून न दिल्याने रईसुद्दीनकडून पत्नी शबनम हिला तलाक

तलाकच्या विरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना चालू आहेत. याचा अर्थ धर्मांधांना शिक्षेची भीती वाटत नाही, असेच म्हणावे लागेल ! त्यामुळे आता अधिक कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने यात पालट केला पाहिजे !

ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांचा मृत्यू

कोरोनावर ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’च्या लसीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जात आहेत. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे.

दळणवळण बंदीच्या शक्यतेमुळे मुंबईतील रेल्वेस्थानकांवर गावाला जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल या दिवशी जनतेशी साधलेल्या ‘ऑनलाईन’ संवादामध्ये ‘येत्या २ दिवसांत दळणवळण बंदीविषयी निर्णय घेण्यात येईल’, असे म्हटले होते.

अतिरेकी प्रेम !

एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.

पुणे जिल्हा माहिती अधिकारी आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे निधन

राजेंद्र सरग यांनी पुण्यासमवेत बीड, नगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते विनामूल्य व्यंगचित्र करून देत असत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.

अयोध्येतील ५ एकर भूमीवर मशिदीसाठी आतापर्यंत केवळ २० लाख रुपयांचीच देणगी गोळा !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी हिंदूंना देण्यात येतांना मुसलमानांना ५ एकर भूमी देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार अयोध्येतील धन्नीपूरमध्ये ५ एकर जागा देण्यात आली. येथे सध्या मशीद बांधण्यात येत आहे.

श्री सिद्धेश्‍वर मंदिराच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटवले !

मुल्ला बाबा टेकडी येथील ८ गुंठे भूमी ही श्री सिद्धेश्‍वर महाराज मंदिर देवस्थान समितीची आहे. धार्मिक रितीरिवाज येथे केले जातात; मात्र अतिक्रमणामुळे मंदिराचे धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. श्री सिद्धेश्‍वर पंच कमिटीने दिवाणी न्यायालयात भूमीचे पुरावे सादर केले.

पुण्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांसंदर्भात रेस्टॉरंट मालकांची तीव्र अप्रसन्नता

लोकांच्या जिवापेक्षा दुसरे काय महत्त्वाचे असू शकते ?

एकाच दिवशी ४ लाख ६२ सहस्र नागरिकांना कोरोनाची लस देऊन महाराष्ट्राचा राष्ट्रीय विक्रम !

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने आतापर्यंत ७३ लाख ४७ सहस्र ४२९ जणांना कोरोनावरील लस दिली आहे.