दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
अमरावती – मेळघाटातील हरिसालच्या वन परीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी ४ एप्रिल या दिवशी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे रहाणार्या दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. या वेळी यशोमती ठाकूर यांनी तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले, तसेच दीपाली यांच्या आत्महत्येला जे कोणी उत्तरदायी असतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.