अपात्र लोकांकडूनही लस घेतली जात असल्याने निर्णय
नवी देहली – केंद्र सरकारने देशातील इतर गटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पहिल्या फळीतील कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचार्यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला. सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना तसा आदेश दिला आहे. नियमांचा भंग करून काही अपात्र असलेले लोकही कोरोनाची लस घेत असल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.