तत्परतेने धावत येतो भक्तांच्या हाकेला श्रीहरि ।
तत्परतेने धावत येतो भक्तांच्या हाकेला श्रीहरि ।
गुरुरूप घेऊन तो सर्व भक्तांना तारी ॥ १ ॥
न समजे हे सर्वांना जरी, कसे भक्तांसंगे रहातो श्रीहरि ।
गोड गुपित हे भक्तांनाच दावतो श्रीहरि ॥ २ ॥
तत्परतेने धावत येतो भक्तांच्या हाकेला श्रीहरि ।
गुरुरूप घेऊन तो सर्व भक्तांना तारी ॥ १ ॥
न समजे हे सर्वांना जरी, कसे भक्तांसंगे रहातो श्रीहरि ।
गोड गुपित हे भक्तांनाच दावतो श्रीहरि ॥ २ ॥
ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ या पाचव्या वेदाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून ते आध्यात्मिक साधनेचे विश्व निर्माण करत आहेत.
उन्हाळा चालू झाला असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमातील अंथरुणे-पांघरुणे, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य, तसेच लाकडी फर्निचर आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.
दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात. – प.प. भगवान श्रीधरस्वामी