महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत आहे !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून राज्य सरकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पाण्याची समस्या हा गंभीर विषय ! – उद्धव ठाकरे

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे २२ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केली.

सनातनद्वेषी बाबा आढाव !

अध्यात्म काही ‘पुरोगामी’ झालेले नाही. ते सनातनच आहे. एवढेच कशाला रामायण, महाभारत या मालिकांनी भारतियांना आजच्या काळातही त्यांचे उद्योग बंद करून खिळवून ठेवले; ते त्यामध्ये असे काही तरी आहे, जे समाजमनाला भावले म्हणूनच ना ?

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये प्रतिदिन वापरण्यासाठी ‘टूथपेस्ट’ची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक रहातात. भारतभरातील सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी पुढील वर्णनाप्रमाणे एकूण ५००० टूथपेस्टची आवश्यकता आहे.

श्रीराम मंदिराची मोहीम कोरोनाचे नियम पाळून राबवली जाऊ शकते ! – मद्रास उच्च न्यायालय

शासनाने घेतलेल्या भूमिकेस मान्यता देता येत नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या जिल्हा संयोजकांना मदुराई येथील त्यांच्या वाहनाद्वारे श्रीराममंदिराविषयी जनजागृती मोहीम राबवण्याची अनुमती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बैठक घेऊन काँग्रेसकडून हरताळ !  

२३ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र काँग्रेस समितीकडून राज्य निवड मंडळ बैठक बोलावण्यात आली होती; मात्र या बैठकीत कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडालेला पाहिला मिळाला.

सोनम वांगचूक यांनी निर्माण केले लडाख सीमेवरील सैनिकांसाठी खास तंबू !

लडाखमधील सोनम वांगचूक यांनी तेथील बर्फाच्छादित सीमेवर तैनात सैनिकांसाठी थंडीपासून बचाव करणार्‍या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचे ‘सोलर हिटेड मिलेट्री टेन्ट’ नावाचे हे तंबू सौरऊर्जेवर हिटरचा वापर करून बनवण्यात आले आहेत.

नियमांचे पालन होत नसल्याच्या दु:स्थितीविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

शासकीय परिपत्रक काढून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार्‍या मंत्रालयातच कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. याविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णु पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना मंत्रालयातील दु:स्थितीविषयी अवगत केले आहे.

माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची नित्योपचार पूजा पार पडली 

माघ एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर श्री रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गलिच्छ राजकारण झाले ! – वनमंत्री संजय राठोड 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गलिच्छ राजकारण झाले, अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना दिली. या प्रकरणावर राठोड यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.