स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसलीच पाहिजेत ! – विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच-विश्‍व हिंदू परिषद

अंमलबजावणी संचालनालयाकडून सौ. वर्षा राऊत यांना पुन्हा नोटीस

सौ. राऊत यांना ११ जानेवारी या दिवशी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

पिंपरी महापालिकेच्या १ सहस्र ३०० मिळकतींचा अवैध वापर; कोट्यवधींची हानी – माजी खासदार गजानन बाबर

महापालिकेचे व्यापारी गाळे, भाजी मंडईचे गाळे आदी मिळून पालिकेच्या मालकीच्या जवळपास १ सहस्र ३६९ मिळकतींचा अवैध वापर होत असून पालिकेची २ वर्षांत ३ कोटींची हानी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप पुरी यांना कळवले आहे.

सर्व आदेश धाब्यावर बसवून नायलॉन मांजाची खुलेआम विक्री

नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने प्रतिवर्षी अनेक लोक गंभीर घायाळ होतात, तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो !

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची काँग्रेसची भूमिका

काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे म्हटले आहे.

तासगाव शहरात मनसेच्या महिला आघाडीच्या वतीने मटका अड्डा उद्ध्वस्त

तासगाव शहरातील सोमवार पेठेत चालू असणारा मटका अड्डा मनसेच्या महिला आघाडीच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष राक्षे आणि प्रमोद मगदूम यांना अटक केली आहे.

ऊस आंदोलनाची ठिणगी भडकली

एकरकमी ‘एफ्आर्पी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन चालू केले आहे. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवून दिलेे.

अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या बहिणीला अमली पदार्थविरोधी पथकाकडून समन्स

अमली पदार्थांची बजबजपुरी असलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

भूसर्वेक्षणास विरोध करणार्‍या मेळावली ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीहल्ला आणि अश्रूधुराचा वापर : ग्रामस्थांकडूनही दगडफेक

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला ६ जानेवारी या दिवशी हिंसक वळण लागले. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे ६ जानेवारी या दुसर्‍या दिवशी भूसर्वेक्षण अधिकार्‍यांना बंद करावे लागले.