हिंदु जनजागृती समितीचे हिंदु संघटनांना आवाहन !

हिंदु जनजागृती समिती ही भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असून त्या दृष्टीने हिंदु संघटनांच्या संघटनासाठी विविध माध्यमांतून प्रयत्नरत आहे. समिती प्रसारकार्य करण्यासाठी सामाजिक संकेतस्थळांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) हिंदूंमध्ये जागृती करणार्या विविध ‘पोस्ट’ आणि ‘व्हिडिओ’ प्रसारित करते.

हिंदु संघटनांच्या संघटनासाठी एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी तसेच कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समितीच्या वतीने सभा, हिंदुजागृती बैठका, हिंदु राष्ट्र अधिवेशन आदींचे आयोजन करण्यात येते. हे कार्य करतांना काही कटू अनुभवही येत आहेत. काही संघटनांचे कार्यकर्ते अन्य संघटनांच्या प्रसारसाहित्यावरील (व्हिडिओ, पोस्ट, पत्रके यांवरील) केवळ संघटनेचे नाव पालटून ते साहित्य स्वतःच्या नावे प्रसारित करत असल्याचे लक्षात आले आहे. खरेतर हिंदु जागृतीसाठी संघटनांनी एकमेकांचे प्रसारसाहित्य एकमेकांना विश्वासात घेऊन आदान-प्रदान करत चांगल्या प्रकारे त्याचा वापर करायला हवा. संघटनांनी एकमेकांशी सुसंवाद साधायला हवा; मात्र असे न केल्याने २ संघटनांमध्ये विसंवाद निर्माण होण्याची, विश्वासार्हता अल्प होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच जाणते-अजाणतेपणाने केलेल्या अशा कृतीतून हिंदुत्वाच्या कार्याची हानी होऊ शकते.
अशा प्रकारे हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी एकमेकांचे प्रसारसाहित्य अवश्य वापरू शकतो; मात्र ज्या संघटनेने ते बनवले आहे, तिचे नाव त्यावरून काढू नये. त्यातील संदर्भ आहे तसे ठेवावेत. ज्यांनी बनवले आहे, त्यांचे नाव काढून स्वतःचे किंवा स्वतःच्या संघटनेचे नाव घातल्याने एकच पोस्ट २ वेगवेगळ्या संघटनांच्या नावाने प्रसारित होते. ते पाहून ‘धर्मप्रेमी हिंदूंमध्ये विकल्प निर्माण होत आहेत’, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या उत्तरदायी पदाधिकार्यांनी ‘आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अशी कृती होत नाहीत ना’, याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे हिंदूसंघटनासाठीही पूरक ठरेल.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे