निष्क्रीय पोलीस प्रशासन !

तासगाव (जिल्हा सांगली) – तासगाव शहरातील सोमवार पेठेत चालू असणारा मटका अड्डा मनसेच्या महिला आघाडीच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष राक्षे आणि प्रमोद मगदूम यांना अटक केली आहे. शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी मटका चालू असून तो बंद करावा, अशी मागणी मनसेच्या दीपाली पुडकर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आणि तासगाव उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली होती. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने ५ जानेवारी या दिवशी पुडकर, मनसेचे शहराध्यक्ष यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी या अड्डयावर धाड टाकून तो उद्ध्वस्त केला. या वेळी महिलांनी घटनास्थळी कपाट आणि अन्य सामान यांची तोडफोड केली. (निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न केल्याने मनसेच्या महिला आघाडीला धाड टाकून मटका अड्डा उद्ध्वस्त करावा लागला, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. यामुळे पोलीस आणि संबंधित गुन्हेगार यांच्यात साटेलोटे आहे, असे जनतेला वाटल्यास गैर ते काय ? – संपादक)
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !