कोरोनाविरोधात लढण्यासाठी सैन्य सज्ज ! – सैन्यदल प्रमुख

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.

अमेरिकेत कोरोनाचे ८५ सहस्र ७४९ रुग्ण

जागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनाच्या संसर्गाचे नवे केंद्र बनल्याचे समोर येत आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. तेथे एकूण ८५ सहस्र ७४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून अमेरिकेने रुग्णांच्या आकडेवारीत चीन (८१ सहस्र ३४०) आणि इटली (८० सहस्र ५८९) यांना मागे…

रिझर्व्ह बँकेकडून विविध कर्जांच्या व्याजदरात कपात

देशभरात दळणवळण बंदी लागू असतांना अर्थव्यवस्था आणि कर्जभार असलेल्या व्यक्ती यांना आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली. मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत दिली आहे.

‘सीएए’चे समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान करणारे धर्मांध प्राध्यापक निलंबित

येथील ‘जामिया मिलिया उस्मानिया विद्यापिठा’तील साहाय्यक प्राध्यापक अहमद अबरार यांनी ट्वीट करून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान केले होते. याची नोंद घेत विद्यापिठाच्या प्रशासनाने त्यांना निलंबित केले.

खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये बंद ठेवून रुग्णांची असुविधा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. त्यामध्ये वयोवृद्ध, महिला, मुले असतात. त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांनी स्वत:ची चिकित्सालये बंद करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

केरळमध्ये दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

येथे दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका ३५ वर्षीय व्यसनी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. इतर वेळी हा तरुण प्रतिदिन २ ते ३ वेळा मद्य पिण्यासाठी जात होता; मात्र दळणवळण बंदी झाल्यानंतर त्याला मद्य न मिळाल्याने तो त्रस्त झाला होता.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एम्.आय.एम्.चे जिल्हाध्यक्ष मंसूर आलम यांना अटक

सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम्.चे प्रयागराज जिल्हाध्यक्ष मंसूर आलम यांना पोलिसांनी अटक केली. मंसूर हे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जवळचे समजले जातात. मंसूर यांनी ‘फेसबूक’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये लिहिले होते…

इचलकरंजी येथे नमाजपठणासाठी जमलेल्यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांची दगडफेक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असतांनाही गावभाग परिसरातील एका प्रार्थनास्थळात ७० हून अधिक धर्मांधांच्या उपस्थितीत नमाजपठण चालू होते. ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आणि प्रभारी निरीक्षक यांनी या ठिकाणी जमलेल्या सर्वांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला.

बेळगाव येथे दळणवळण बंदीच्या वेळी मशिदीत नमाजासाठी गेलेल्यांना पोलिसांकडून चोप !

येथे दळणवळण बंदी असतांनाही त्याचे उल्लंघन करत अनेक लोक नमाजसाठी मशिदीत गेले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडणार्‍या लोकांना चांगलेच चोपले. दळणवळण बंदी असल्यामुळे मशिदींमध्ये जाण्यास बंदी असतानाही धर्मांध तेथे जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

स्वयंसूचनांविषयीचे सविस्तर विवरण सनातनचा ग्रंथ ‘स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन’ यात केले आहे. दंगल, भूकंप, महायुद्ध आदींच्या वेळी उद्भवणार्‍या स्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास संबंधित प्रसंगांचा सराव करण्यासाठी स्वयंसूचना द्यावी !