बेळगाव येथे दळणवळण बंदीच्या वेळी मशिदीत नमाजासाठी गेलेल्यांना पोलिसांकडून चोप !

सरकारने अशा जनताद्रोह्यांना केवळ चोप देऊन सोडू नये, तर आजन्म कारागृहात डांबावे !

बेळगाव – येथे दळणवळण बंदी असतांनाही त्याचे उल्लंघन करत अनेक लोक नमाजसाठी मशिदीत गेले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडणार्‍या लोकांना चांगलेच चोपले. दळणवळण बंदी असल्यामुळे मशिदींमध्ये जाण्यास बंदी असतानाही धर्मांध तेथे जात असल्याचे निदर्शनास आले आहे.