‘अल्पसंख्य’ म्हणून नेहमीच ओरड करणारे राष्ट्रीय आपत्तीच्या काळातही गुन्हेगारीत बहुसंख्य कसे ? यातून धर्मांधांची राष्ट्रविरोधी मानसिकता उघड होते !
इचलकरंजी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असतांनाही गावभाग परिसरातील एका प्रार्थनास्थळात ७० हून अधिक धर्मांधांच्या उपस्थितीत नमाजपठण चालू होते. ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आणि प्रभारी निरीक्षक यांनी या ठिकाणी जमलेल्या सर्वांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला आहे. (कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात एकीकडे हिंदू सहकार्य करत असतांना धर्मांध मात्र प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र येऊन पोलिसांनाही जुमानत नाहीत, असे दिसत आहे. त्यामुळे धर्मांध देशहितापेक्षा पहिल्यांदा धर्मच मानतात, हे या उदाहरणावरून समोर येते. आतातरी शासनाने अल्पसंख्यांकांच्या नावाखाली यांना किती काळ सुविधा चालू ठेवायच्या, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे ! – संपादक)
दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांनाही या प्रार्थनास्थळामध्ये धर्मांध नमाजपठणासाठी जमले होते. हे धर्मांध प्रार्थनास्थळाच्या पाठीमागील दारातून आत येऊन नमाजपठण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सर्वांना बाहेर येण्याचे आवाहन केले. प्रत्येकाच्या नावाची नोंद घेऊन एकेकाला बाहेर सोडले जात होते. काहींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास प्रारंभ केला आणि त्यातच काही युवकांनी आरडाओरड करत दगडफेक करण्यास प्रारंभ केला.
धर्मांधांकडून गोंधळ चालू होताच प्रार्थनास्थळाच्या मागून मोठ्या संख्येने महिलांसह धर्मांधांचा जमाव आला आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास प्रारंभ केला. या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांची अधिक कुमक मागवली. पोलिसांकडून आक्रमणकर्त्यांचा शोध घेण्याचे काम चालू असून ४८ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील ३ जणांना कह्यात घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जमावबंदी आदेश यांचा भंग करणे, पोलिसांवर आक्रमण करून शासकीय कामात अडथळा आणणे आदी विविध गुन्हे या धर्मांधांवर नोंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.