कोरोनाविषयी अफवा पसरवल्याचे प्रकरण
- अशा प्रकारची जनताद्रोही कृत्ये करणार्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
- देशात जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे, तेव्हापासून काही धर्मांध जाणीवपूर्वक जनताद्रोही कृत्ये करत आहेत. याविषयी एकही राजकीय पक्ष, निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम्.चे प्रयागराज जिल्हाध्यक्ष मंसूर आलम यांना पोलिसांनी अटक केली. मंसूर हे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जवळचे समजले जातात. मंसूर यांनी ‘फेसबूक’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये लिहिले होते, ‘‘भारतात ५०० नाही, तर ५० सहस्रांहून अधिक लोक कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू पावले आहेत. सरकार खोटे बोलत आहे.’’ ही पोस्ट प्रसारित झाल्यावर काही मिनिटांतच पोलिसांनी या ‘पोस्ट’ची नोंद घेत मंसूर यांना अटक केली.