यंदा नेहमीपेक्षा उन्हाळा कडक असणार ! – हवामान विभाग
राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पाक कोरोनाशी लढण्यास कुठल्याही पातळीवर सक्षम नाही आणि हे पाकिस्तानी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आतातरी पाकला आणि त्यांच्या जिहाद्यांना त्यांनी देशाची कोणती प्रगती केली, हे लक्षात आले असेल, अशीही अपेक्षा करता येणार नाही !
सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करत आहे; मात्र काही ठिकाणी या प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे. जनतेला अजूनही कोरोनाच्या दुष्परिणामांची जाणीव नसल्याचे चित्र दिसत असून राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतांनाही काही जण याचे उल्लंघन करत आहेत.
गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ‘जनता कर्र्फ्यू’ लागू होता आणि यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात राज्यात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पुढे देत आहे.
अमेरिकेमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील २४ घंट्यांमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा ४१९ झाला आहे.
गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे ‘फेसबूक’च्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.
लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असला, तरी २५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला आहे.