कडूलिंबाच्या पानाचे महत्त्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळ्या पानाद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. जिवाला कडूलिंबाच्या पानांच्या माध्यमातून सूक्ष्म-रूपाने प्रजापति लहरी मिळत असतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.