सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा वापर !

निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार ‘डिजिटल’ प्रचारावर भर देत आहेत. याद्वारे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.

वाढती लाचखोरी : कठोर उपाययोजना कधी ?

राज्यात विविध न्यायालयांत चालू असलेले लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे ९३ खटले या वर्षात निकाली निघाले; मात्र यातील केवळ ९ गुन्ह्यांतच १३ आरोपींना शिक्षा झाली. इतक्या अल्प प्रमाणात जर शिक्षा होत असेल, तर शिक्षेचा धाक कसा रहाणार ?

शिवप्रेमी संघटनेच्या वतीने राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीदिनी नूतनमूर्तीचे अनावरण

येथील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने जिजामाता चौकातील राजमाता जिजाबाई यांच्या नूतनमूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या जयंतीदिनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंट बंद

अमेरिकी अ‍ॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्‍या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?

काही वर्षांनी ‘हलाल’ शब्द हटवणे, हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने ‘अ‍ॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी

जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्‍या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

ब्रेक निकामी झाल्याने घारपी घाटात एस्.टी.ला अपघात

घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस  घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते.

प्रत्येक गोष्ट पैशाच्या भाषेत मोजणारे सर्वोच्च न्यायालय !

घरी काम करणार्‍या गृहिणींचे कामही त्यांच्या नोकरी करणार्‍या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनाही वेतन मिळायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.

मये येथील ग्रामस्थांना सनद देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डिचोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाच्या साहाय्याने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘वर्ष २०११ पासून पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशी नागरिक भारतात अवैधरित्या रहात आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाकडून महाराष्ट्राच्या गृहविभागाला कळवण्यात आली आहे.