शिवप्रेमी संघटनेच्या वतीने राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीदिनी नूतनमूर्तीचे अनावरण

शिवप्रेमी आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना यांच्या वतीने जिजामाता चौकातील राजमाता जिजाबाई यांच्या नूतनमूर्तीचे अनावरण

कुडाळ – येथील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने जिजामाता चौकातील राजमाता जिजाबाई यांच्या नूतनमूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या जयंतीदिनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते, तसेच सर्वच पक्षीय कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिजामाता चौक येथे असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नूतनमूर्तीचे काम ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ या संघटनेने काही मासापूर्वी हाती घेतले होते. हे काम पूर्णत्वास नेऊन अनावरण करण्यात आले. या वेळी या कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्व शिवप्रेमींचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.