आता न्यायव्यवस्थेवर विश्‍वास उरला नाही ! – ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल

सिब्बल पुढे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत; मात्र वास्तवात त्यामुळे फार पालट झालेले दिसले नाहीत.

जयपूर येथील श्री खाटूश्यामजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू

हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन केले जात नसल्यामुळे यात्रांमध्ये अशा दुर्घटना घडतात ! भाविकांना दर्शन सुलभतेने मिळण्यासाठी मंदिर प्रशासनानेच उपाययोजना काढल्यास भाविकांना देवाच्या दारात जीव गमवावा लागणार नाही !

स्वतःच्या हेरगिरी जहाजाचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला गेल्याने चीनचा तीळपापड !

जहाजाच्या दौर्‍याला भारताचा विरोध कायम

केरळमध्ये रामायणावर आधारित प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत २ मुसलमान तरुणांचे यश !

किती हिंदु युवक हिंदूंच्या धार्मिक ग्रथांचा अभ्यास करून अशा स्पर्धांमध्ये यश संपादन करतात ?

हास्यास्पद साम्यवाद !

जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?

‘एन्टीपीसी’मधील अधिकार्‍याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक !

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ‘एन्टीपीसी’मधील  (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन) ‘यू.पी.एल्.’ आस्थापनातील लाचखोर सुरक्षा अधिकारी गोविंद कुमार याला कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून रंगेहात पकडले.

वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद

परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली.

चेन्नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’ संघटनेने केले धर्मांतरविरोधी निषेध आंदोलन !

कोईंबतूर येथील ‘करुणाइपलम’ या स्वयंसेवी संस्थेने अनुमाने ३०० भिकार्‍यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले. या धर्मांतराच्या विरोधात ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ या संघटनेने येथील सैदापेट येथे निषेध आंदोलन केले.

बेळगाव येथे नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार ! – जिल्हाधिकारी

खोट्या पत्रकारांमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार आहेत. कोणतेही विनापरवाना वृत्तपत्र, यू ट्यूब, ‘वेबसाईट-बेवपोर्टल’ यांमध्ये काम करणार्‍या पत्रकाराला ओळखपत्र दिले जाणार नाही..

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने २ ठिकाणी वृक्षारोपण

सेक्टर २९ मधील हुडा मार्केटजवळच्या पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन’च्या सदस्यांनीही सहभाग घेतला. असोसिएशनचे महासचिव श्री. सुबोध नागपाल यांनी ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या उपक्रमाचे कौतुक केले.