‘एन्टीपीसी’मधील अधिकार्‍याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक !

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ‘एन्टीपीसी’मधील  (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन) ‘यू.पी.एल्.’ आस्थापनातील लाचखोर सुरक्षा अधिकारी गोविंद कुमार याला कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून रंगेहात पकडले. गोविंद कुमार हे ‘एन्टीपीसी’ अंतर्गत असणार्‍या ‘युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड’ नावाच्या आस्थापनाकडे सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या आस्थापनामध्ये गोविंद कुमार हे कंत्राट देण्यासाठी, कंत्राटदारांची देयके काढण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याला वैतागून एका कंत्राटदाराने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती.

एका कंत्राटदाराने ‘यू.पी.एल्.’ आस्थापनाकडे ५ लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून ठेवले होते. ती रक्कम मिळवण्यासाठी त्याने आस्थापनाकडे मागणी केली होती. रक्कम देण्यासाठी गोविंद कुमार संबंधित कंत्राटदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी करत होते.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या भारतात भ्रष्टाचारमुक्त एकही खाते नाही, ही मोठी शोकांतिका !