आता न्यायव्यवस्थेवर विश्‍वास उरला नाही ! – ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल

ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल

नवी देहली – ज्या न्यायालयात न्यायाधिशांची निवड तडजोडीच्या प्रक्रियेद्वारे होते, असे न्यायालय कधीच स्वतंत्र असू शकत नाही. न्यायालयांमध्ये कोणत्या खंडपिठापुढे प्रकरणांची सुनावणी होईल, हे ठरवण्यासाठी प्रक्रिया नाही. सरन्यायाधीशच याविषयीचा निर्णय घेतात. मी तब्बल ५० वर्षे वकिली केली आहे. तथापि आता न्यायव्यवस्थेवर विश्‍वास उरला नाही, असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी केले. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सिब्बल पुढे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत; मात्र वास्तवात त्यामुळे फार पालट झालेले दिसले नाहीत. कलम ३७७ हटवल्यानंतरही प्रत्यक्षात फार काही पालट झालेला नाही. स्वातंत्र्य तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण त्यासाठी आवाज उठवू आणि स्वातंत्र्याची मागणी करू.