यावर्षी का अन् कशी साजरी करूया हलालमुक्त दिवाळी !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २६.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

इतरांचे अंधानुकरण करण्यापेक्षा वेश, भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करा !

वेश, भाषा आणि राष्ट्रीय संस्कृती या त्रिसूत्रांचे रक्षण करणे आवश्यक आहे. राष्ट्राप्रतीचा भाव प्रकट करणार्‍या या त्रिसूत्रांची अवहेलना करून दुसर्‍यांचे अंधानुकरण केल्याने अपयशच पदरी पडते.

समाजाने धर्माचरण केल्यास आजही महिलांना रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल ! – नरेंद्र सुर्वे

आपल्यालाही श्रीरामासारखा आदर्श राजा हवा असेल, तर आपल्यालाही धर्माचरण आणि साधना करायला हवी. तसे झाले तर केवळ श्रीराम मंदिराच्या उभारणीचे नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर ‘रामराज्य’ आणि रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल.

पैगंबरांविषयी माहिती देणारे साप्ताहिक देण्याच्या निमित्ताने सनातनच्या आश्रमात येऊन माहिती काढू पहाणारे कावेबाज धर्मांध !

१९ ऑक्टोबर म्हणजे ‘ईद’च्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तीन धर्मांध सनातन संस्थेच्या एका राज्यातील एका आश्रमात दुचाकीवरून आले. तेथे स्वागतकक्षात असणार्‍या साधिकेला त्यांनी इस्लामविषयी माहिती देणारे त्यांचे साप्ताहिक दिले.

मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमण होत आहे.

कुठे ‘मनोलय आणि बुद्धीलय कसा करायचा ?’, हे शिकवणारा हिंदु धर्म, तर कुठे बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे.

वक्फ बोर्डाकडे (टीप) सहस्रो कोटी रुपयांची संपत्ती असतांना सरकार केवळ मंदिरांचाच निधी शासकीय, सामाजिक आणि अन्य कामे यांसाठी का वापरते ?

मुळात वक्फ ही इस्लामिक संकल्पना गोरगरिबांच्या साहाय्यासाठी आणि मशीद वगैरेंच्या देखभालीसाठीची आहे. याउलट मंदिरे ही धर्मकार्याची केंद्रे आहेत. समाजकार्याची नव्हे ! असे असतांना मंदिरांच्या निधीतून शासकीय कामे होतात ? याचे कारण काय ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे.

सनातनची नूतन प्रकाशने !

सनातनच्या ‘योगतज्ञ दादाजी यांचे चरित्र’ या मालिकेतील प्रथम ग्रंथ !
पू. अनंत आठवले यांचे चरित्र.