राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २६.१०.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे, अरेरावी करणे, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती आणि दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.’


लोकसंख्या नियंत्रण कायदा केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय

अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

‘भारतातील पाणी, जंगल, भूमी यांच्या समस्या; अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी आदी बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारने कितीही पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या, तरी काही वर्षांनी त्या अल्प पडणार आहेत. यावर कठोर असा ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील.’


हिंदूंच्या मंदिरांची वाढती असुरक्षितता !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मंदिरामध्ये चोरी होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक 

‘सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील सटवाडी, बांदा येथील श्री सटीदेवी मंदिरातील १० सहस्र रुपये किमतीची पितळेच्या घंटेची चोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. याविषयी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.’