आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे. (यासंदर्भातील ९, १० आणि ११ ही सूत्रे आपण १७.१०.२०२१ या दिवशीच्या अंकात पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.)

१२. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या फुटीरतावादाची कुणीच गंभीर नोंद घेतलेली नाही. उलट सरकार त्यांना चुचकारते. यासह त्यांना संरक्षण देत आहे, हे ध्यानात येते.

१३. मनोहर हिरबा सरदेसाई लिखित ‘गोवा, दमण, दीव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास’ या पुस्तकाचे २ खंड, स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांचे ‘डिनॅशनलायजेशन ऑफ गोवन्स’, तसेच अ.का. प्रियोळकर यांचे ‘इन्क्विझिशन ऑफ गोवा’, या महत्त्वाच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण करण्याचे आणि ही पुस्तके सर्व शाळांना पाठवण्याचे सरकार मनावर घेत नाही.  (क्रमशः पुढील रविवारी) ॐ

– प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारतमाता की जय’ संघटना, गोवा.