वाचकांना आवाहन !

दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा….

अर्थार्जनाचे नियम

अक्कल, बुद्धी वापरून, तसेच पुरुषार्थ आणि परिश्रम करून अर्थार्जन केले पाहिजे. अर्थार्जनासाठी पुरुषार्थ अवश्य करावा; पण धर्मानुकूल राहूनच ! गरीबांचे शोषण करून मिळवलेले धन सुख देत नाही.

अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !

सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे.

सुवचने

‘आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंविना अन्य कुणावरही अतीविश्वास ठेवू नका आणि अतीसंशयही घेऊ नका.’ ‘आपल्यापेक्षा लहानांना भेटाल, तेव्हा करुणा ठेवा. आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तींना भेटाल, तेव्हा हृदयात आदर ठेवा.’

पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

शतशः पराक्रमी हिंदु राजे, सहस्रशः सेनापती आणि लक्षावधी सैनिक बुद्धोत्तरकाळात परकियांशी विलक्षण झुंजले. ब्रिटिशांचे अनुकरण करून साम्यवादी प्रणालीने आमच्या भारतियांनी त्यांना स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?’

एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !

‘साधनेमध्ये ‘व्यष्टी साधना’ (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना) आणि ‘समष्टी साधना’ (समाजाच्या उद्धारासाठी करावयाची साधना) असे दोन प्रकार असतात…

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील श्रद्धा मोडण्यासाठी ‘आर्यांचे आक्रमण’, हे थोतांड पसरवले !

आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे.

प्रतिदिन प्रभातकाळी शुभ संकल्प करा !

मी कधीही दुर्बल होत नाही. दुर्बल आणि सबळ शरीर असते. मी तर मुक्त आत्मा आहे. मी परमात्म्याचा चैतन्यमय सनातन अंश आहे. मी सद्गुरुतत्त्वाचा आहे. हा संसार मला हलवू शकत नाही, झटका देऊ शकत नाही.

हनुमान जयंती

चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.