पैगंबरांविषयी माहिती देणारे साप्ताहिक देण्याच्या निमित्ताने सनातनच्या आश्रमात येऊन माहिती काढू पहाणारे कावेबाज धर्मांध !

अशा कावेबाज धर्मांधांपासून सावध रहा ! – संपादक

१९ ऑक्टोबर म्हणजे ‘ईद’च्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तीन धर्मांध सनातन संस्थेच्या एका राज्यातील एका आश्रमात दुचाकीवरून आले. तेथे स्वागतकक्षात असणार्‍या साधिकेला त्यांनी इस्लामविषयी माहिती देणारे त्यांचे साप्ताहिक दिले. एका धर्मांधाने साधिकेला साप्ताहिक देतांना ‘छायाचित्र काढू का ?’ अशी विचारणा केली. ‘यात महंमद पैगंबरांविषयी माहिती आहे’, असे त्याने सांगितले. त्या साधिकेने छायाचित्र काढण्यास नकार दिला आणि एका साधकाला तिथे बोलावले. या साधकाने त्या धर्मांधांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी, ‘आम्ही इस्लामचा प्रचार करत आहोत. पैगंबरांची माहिती लोकांपर्यंत आम्ही पोचवत आहोत. ही माहिती जशी इतरांना देतो, तशी तुम्हाला देण्यासाठी आलो आहोत’, असे सांगून ते निघून गेले. (‘सनातनच्या आश्रमात हिंदुत्व, हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचीच शिकवण दिली जाते’, हे ठाऊक असूनही धर्मांध जाणीवपूर्वक येऊन इस्लाम अन् पैगंबर यांच्याविषयी माहिती देणारे साप्ताहिक देतात, यावरून त्यांचा कावेबाजपणा लक्षात येतो. तसेच छायाचित्र काढण्याच्या बहाण्याने ते साधकांचे छायाचित्र मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, हेही लक्षात येते ! – संपादक)