सनातनची नूतन प्रकाशने !

सनातनच्या ‘योगतज्ञ दादाजी यांचे चरित्र’ या मालिकेतील प्रथम ग्रंथ !

कलियुगातील द्रष्टे ऋषि !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

प्राचीन काळी ऋषिमुनींनी केलेले खडतर तप, त्यांचे द्रष्टेपण, सर्वज्ञता, लीलासामर्थ्य इत्यादींविषयी आपल्याला वाचनातून ठाऊक असते. तसे सध्या कलियुगात होऊन गेलेले अद्वितीय व्यक्तीमत्त्व म्हणजे योगतज्ञ दादाजी ! मोठमोठे योगीजन सिद्धींच्या मोहात अडकतात; पण योगतज्ञ दादाजींनी खडतर तपश्चर्येने प्राप्त केलेल्या सिद्धींचा दुरुपयोग कधीच केला नाही. त्यांनी ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे केलेली अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरल्याचे पाहून अनेक बुद्धीवंत साधनारत झाले. त्यांनी आयुष्यभर पीडितांच्या विविध संकटांच्या निवारणाचे कार्य केले. त्यांचा साधनाप्रवास, गुणवैशिष्ट्ये, त्यांचे लोकोत्तर कार्य, त्यांनी स्वतःच्या वैकुंठगमनाविषयी अनेकांना दिलेल्या पूर्वसूचना आणि साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती प्रस्तुत ग्रंथात दिल्या आहेत.


पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये

पू. अनंत आठवले

पू. अनंत आठवले यांचे चरित्र : खंड १

पू. अनंत आठवले म्हणजे विविध गुणांनी अलंकृत असलेले ज्ञानयोगी व्यक्तीमत्त्व ! साधना करतांना व्यष्टी गुणांसह समष्टी गुणही आचरणात आणले, तर अध्यात्मात लवकर प्रगती होते. पू. अनंत आठवले यांच्या चरित्रात व्यष्टी आणि समष्टी गुणांचा सुरेख संगम आहे. सनातनने प्रकाशित केलेल्या प्रस्तुत ग्रंथाच्या अभ्यासाने व्यष्टी प्रवृत्तीच्या (‘मी आणि माझी साधना’ एवढाच विचार करणार्‍या) साधकांनाही इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, सेवा परिपूर्ण करणे यांसारखे समष्टी गुण आचरणात आणण्यासाठी योग्य दिशा मिळेल अन् त्यांना आध्यात्मिक प्रगती वेगाने करता येईल !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com ला भेट द्या !

अवश्य भेट द्या : www.Sanatan.org

संपर्क : ९३२२३१५३१७