कोर्लई (जिल्हा रामनाथ (अलिबाग)) येथील कथित बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर (आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी) यांच्या नावावर असलेल्या जागेतील कथित १९ बंगल्यांच्या घोट्याळ्याच्या प्रकरणी येथील ग्रामपंचायत अधिकारी, तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रोड शो’ !

येथील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने ‘रोड शो’ काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी यांमध्ये सहभागी झाले होते.

कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिरोळ तालुका (जिल्हा कोल्हापूर) समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २६ फेब्रुवारीला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्‍या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथील विकासकामांसाठी निधी संमत

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह समाजमंदिर उभारणे, नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे.

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी दुर्गप्रेमींनी एकत्र यावे  ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-  दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘कट प्रॅक्टिस’ विरोधी कायद्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन होणार !

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ कट प्रॅक्टिस’ कायदा लागू करण्याविषयी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

सातारा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ !

जिल्ह्यातील बाल गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ करण्यात आला आहे. ही योजना १५ ते २५ वयोगटांसाठी राबवली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे ४ सहस्र ५०० हून अधिक अंगणवाड्या बंद !

जनतेला संप करावा न लागता त्यांच्या अडचणी सोडवण्याची मानसिकता प्रशासनाने ठेवावी, असेच जनतेला वाटते !

उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे !

आम्ही धडाकेबाज निर्णय घेत असल्यामुळे विरोधक बिथरले आहेत. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ.