उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथील विकासकामांसाठी निधी संमत

ठाणे – राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह समाजमंदिर उभारणे, नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाकडून उल्हासनगर महापालिकेला हा निधी संमत झाला आहे.