महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

विनामूल्य मिळणार्‍या पंचतत्त्वाची जपणूक करा ! – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हिंदूंच्या संघटनासाठी प्रेरणादायी ठरेल ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

सहस्रो हिंदु युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील मोठे संकट ‘हलाल जिहाद’, वक्फ बोर्ड कायद्यामुळे वाढत असलेला ‘लँड जिहाद’ आणि हिंदूंवर होणार्‍या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी या हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन !

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलला आग; प्रवाशांची धावपळ !

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकलमधून १६ फेब्रुवारीला अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे भयभीत होऊन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, तर काहींनी साखळी ओढून लोकल थांबवली.

ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद !

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १५ फेब्रुवारीला संध्याकाळी आक्रमण केले. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांसमोरच हा प्रकार घडला.

पुणे येथील कोयता गँगचा बीमोड करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम !

शहरातील ४३ गुंडांना तडीपार करण्यात आले असून १२ टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.

कराड येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक हस्तगत !

नूडल्सच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडून विदेशी दारूच्या बाटल्या, आयशर ट्रक, भ्रमणभाष असा ५२ लाख ७३ सहस्र ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कराड येथील श्री मारुतीबुवा मठाच्या तत्कालीन मठाधिपतीस ७ वर्षे सक्तमजुरी !

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीराव जगताप यांना न्यायालयाने दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पाकीटबंद पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक ‘वनस्पतीजन्य’ कि ‘प्राणीजन्य’ आहेत, हे ओळखण्याची यंत्रणाच नाही !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अर्जानंतर माहिती अधिकारातून अन्न आणि औषध प्रशासनाचा फोलपणा उघड !

गोव्यात वीज दरवाढीला तीव्र विरोध

‘सरकार कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग विजेचा भार सरकारनेच सोसावा’, अशा प्रतिक्रिया जनसुनावणीच्या वेळी उमटल्या.