गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथील वसाहत रुग्णालयातील रुग्णांवर वेळेत योग्य उपचार व्हावेत ! – राजू यादव

निवेदन स्वीकारल्यावर वैद्यकीय अधीक्षक विद्या पॉल यांनी ‘यापुढे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार करू’, असे आश्वासन दिले. या प्रसंगी विक्रम चौगुले, योगेश लोहार, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, दीपक धिंग यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करणार्‍या बिहारमधील २ धर्मांधांना अटक !

कोथरूड येथील एका बांधकाम व्यावसायिकाची ६६ लाख ४१ सहस्र ५२२ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बिहार राज्यातील बेलाल अन्सारी आणि कामरान अन्सारी यांना अटक केली आहे.

पाटण (जिल्हा सातारा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !

या कारवाईमध्ये २५ खोकी गोवा बनावटीचे मद्य, एक दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची ५५३ कॅरेट आणि एक चारचाकी वाहन कह्यात घेण्यात आले आहे. तसेच ३ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

जुन्नर, शिरूर तालुक्यांमध्ये (पुणे) २०० किलो ‘अल्प्राझोलम’चा साठा जप्त !

या ‘अल्प्राझोलम’चा वापर मनोविकारांसाठी लागणार्‍या औषधांसाठी केला जातो; परंतु याचा वापर अमली पदार्थ सिद्ध करण्यासाठी केला जात असावा असा संशय एन्.सी.बी.तील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असणारा फलक पालटा ! 

उल्हासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा निर्देशक फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे पूर्ण नाव न लिहिता ‘शिवाजी चौक’ असे लिहिले आहे.

‘माझ्या मुलाचा ‘एन्काऊंटर’ करा’, असा पुढार्‍यांचा पोलिसांना आदेश असल्याचा ललित पाटील याच्या आईचा आरोप !

टीव्हीला दाखवल्यापासून आम्हाला धक्काच बसला आहे. मुलाने असे केले, ते चुकीचे आहे. या गोष्टीची मला कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया ललित पाटील यांच्या आईने ‘टीव्ही-९’ या वाहिनीशी बोलतांना दिली आहे.

वीजचोरी करणार्‍या ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंद ! 

डोंबिवलीजवळील खोणी गावात वीजचोरी पडताळणीसाठी गेलेल्या महावितरणच्या विशेष पथकावर ग्रामस्थांनी आक्रमण केले होते. त्यात कर्मचार्‍यांसह पोलीसही गंभीररित्या घायाळ झाले.

कात्रज येथे सक्तवसुली संचालनालयाची कारवाई !

बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून राज्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कात्रज भागात मोठी कारवाई केली.

टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवणार्‍या धर्मांधास जमावाचा चोप : धर्मांधावर गुन्हा नोंद आणि अटक !

सहस्रो हिंदूंचे धर्मांतर करणारा, त्यांच्या सामूहिक हत्या करणारा, हिंदु महिलांवर बलात्कार करणार्‍या आणि मंदिरांचा विध्वंस करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान अनेक धर्मांधांच्या मनात घर करून बसलेला आहे. तो पुसून टाकण्यासाठी परत असे कुणी करणार नाही, अशी कठोर पावले आता सरकाने उचलावीत !

हिंदु देवतांचे विडंबन केल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी !

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्यावा !