उत्तरप्रदेशातील अनधिकृत मदरशांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांची चौकशी होणार !

विशेष अन्वेषण पथकाची स्थापना

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील मदरशांना विदेशातून मिळणार्‍या देणग्यांची चौकशी करण्यासाठी एका विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे. हे पथक मदरशांना कुठून देणग्या मिळतात ? त्यांचा वापर कसा करण्यात येतो ? आणि राज्यात किती अनधिकृत मदरसे आहेत ? यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी सरकारने देशातील अनधिकृत मदरसे शोधण्यासाठी एक सर्वेक्षणही केले होते. त्यात १६ सहस्र ५१३ अधिकृत आणि ८ सहस्र ५०० मदरसे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. या अनधिकृत मदरशांवर विदेशातून देणग्या येत असल्याचा आरोप आहे. याचीच चौकशी आता केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशमधील तराई जिल्ह्यातील मदरशांची संख्या यात अधिक आहे. हे मदरसे नेपाळच्या सीमेवर आहेत आणि त्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या सीमेवर १ सहस्र ५०० हून अधिक अनधिकृत मदरसे आहेत, तसेच नेपाळ सीमेवर मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारचे अनधिकृत मदरसे चालू होईपर्यंत आणि त्यांना विदेशातून देणग्या मिळेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?