इस्रायलच्या समर्थनासाठी स्विडनमध्ये सलमान मोमिका यांची कृती !
स्टॉकहोम (स्विडन) – येथे इराकी शरणार्थी सलमान मोमिका यांनी इस्रायलच्या झेंड्याचे चुंबन घेत कुराणला पायाखाली चिरडत असल्याचा स्वतःचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. याद्वारे त्यांनी इस्रायलला समर्थन असल्याचे दाखवले आहे. मोमिका यांनी २८ जून या दिवशी पोलिसांच्या अनुमतीने येथील सर्वांत मोठ्या मशिदीबाहेर कुराण जाळले होते.