आत्मघाती आक्रमणांत अफगाणी सहभागी असल्यावरून हाकलले जात आहे !
काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानने एकाच दिवसात त्याच्या देशातून ३ सहस्र २४८ अफगाणी शरणार्थींना अफगाणिस्तानमध्ये पाठवून दिले. पाकने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अवैधरित्या रहात असलेल्या ५१ सहस्रांहून अधिक शरणार्थींना परत अफगाणिस्तानमध्ये पाठवून दिले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार, तसेच संयुक्त राष्ट्रे आणि मानवाधिकार संघटना ‘अॅम्नेस्टी’ यांनी पाकच्या कृतीचा विरोध केला आहे. यावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये होत असलेल्या आत्मघाती आक्रमणे रोखण्यासाठी अनधिकृतरित्या रहाणार्या अफगाणींना हाकलण्यात येत आहे. अशांना १ नोव्हेंबरपर्यंत देशातून जाण्याची मुदत देण्यात आली आहे. पाकचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले की, आतंकवाद आणि तस्करी यांत सहभागी लोकांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|