Aung San Suu Kyi : म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांची कारागृहातून अचानक सुटका !

आँग सान स्यू की यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरी त्या नजरकैदेत असतील, असे म्यानमारच्या सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

T Raja Singh : भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी काँग्रेस सरकारचा विरोध झुगारून काढली मिरवणूक !

रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?

पुणे येथे आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्‍यांना अटक !

कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील ‘पटेल टेरेस’ इमारतीमध्ये आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्‍या १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

पेपरफुटीत दोषी आढळलेल्या २ महाविद्यालयांची परीक्षा केंद्रे ३ वर्षांसाठी रद्दबातल !

महाविद्यालयेच पेपरफुटी करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडेल, याचा विचारच न केलेला बरा !

Rain 2024 : या वर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज !

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती गेल्या ९ वर्षांच्या आकडेवारीवरून चांगली असणार, असे  सांगितले.

पोटच्या मुलीची हत्या करणार्‍या धर्मांध जोडप्याला अटक !

लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक

मुंबई विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद !

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामासाठी ९ मे या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे येथे उजनी धरणातील पळसनाथ मंदिर भाविकांना दाखवण्यासाठी मासेमारांची विनामूल्य सेवा !

उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये पळसनाथ मंदिरासह राजवाडे, पूल पाण्याखाली गेले आहेत. सध्या धरणातील पाणीसाठा अल्प झाल्याने हे सर्व उघडे पडले असून ते पहाण्याचा दुर्मिळ योग भाविकांना येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर कोल्हापूर येथे गुन्हा नोंद !

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ विनापरवाना रॅली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या !

शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !