मुंबई विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामासाठी ९ मे या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई विमानतळ प्रशासन मान्सूनपूर्व कामे करणार आहे. यामध्ये धावपट्टीची दुरुस्ती, धावपट्टीच्या बाजूच्या दिव्यांची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.