पोटच्या मुलीची हत्या करणार्‍या धर्मांध जोडप्याला अटक !

१८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, १६ एप्रिल (वार्ता.) – पोटच्या मुलीची हत्या करणारे धर्मांध जोडपे नुरानी जाहीद शेख (वय २८ वर्षे) आणि वडील जाहीद सलामत शेख (वय ३८ वर्षे) यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) २ मुले आणि ३ मुली झाल्याने त्यांनी त्यांची दीड वर्षांची मुलगी लबीबा हिची हत्या केली. संतोष महादेव या बनावट नावाने पोलिसांना प्राप्त झालेल्या अर्जामुळे हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दांपत्याची कसून चौकशी केली असता मुलीची हत्या करून मृतदेह पुरल्याचे मान्य केले. हत्येची घटना १८ मार्चला घडली. दांपत्याला न्यायालयात उपस्थित केले असता १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.