‘हिंदुत्व खोट्या आधारावर उभारले आहे’, असे ट्वीट करणारे कन्नड अभिनेता चेतन कुमार अटकेत !

सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून समाजातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

इंदूरमध्ये ‘पी.एफ्.आय.’च्या गुप्तहेराला पकडून देणार्‍या अधिवक्त्यावर आक्रमण !

इंदूरमधील सदरबाजार भागात न्यायालयात ‘पी.एफ्.आय.’ या बंदी घातलेल्या संघटनेसाठी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करणार्‍या गुप्तहेराला पकडून देणार्‍या अधिवक्त्याला तिघा धर्मांधांनी बेदम मारहाण केली.

केरळमध्ये हिंदूंच्या विरोधानंतर मंदिराला दिलेला पाकच्या ध्वजासारखा रंग मंदिराच्या व्यवस्थापनाने पुसला !

‘हिंदु ऐक्यवेदी’ या संघटनेनेही चेतावणी दिली होती की, मंदिराचा रंग पुसला नाही, तर संघटनेचे कार्यकर्ते स्वत: तो पुसतील. हे मंदिर ‘मलबार देवस्वोम् मंडळा’च्या वतीने चालवले जाते. या मंडळावर साम्यवादी आणि नास्तिक यांचा प्रभाव आहे. पूरम् उत्सवापूर्वी मंदिराला ही रंगरंगोटी करण्यात आली होती.

सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.

भारतीय सैन्य उत्तरेत व्यस्त असतांना दक्षिण भारत कह्यात घेण्याचे होते पी.एफ्.आय.चे लक्ष्य !

पी.एफ्.आय.ने सशस्त्र बंडखोरी करून सरकार उलथवून तेथे इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या लक्ष्यासाठी रणनीती सिद्ध केली होती. यात सदस्यांची गुप्तपणे भरती करून आणि त्यांचे सैन्य निर्माण करून त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे. तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रयाला अटक

‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये !

ज्ञानवापीतील शिवलिंगाचे वयोमान पडताळण्यावर तात्काळ प्रतिज्ञापत्र सादर करा !

यावर पुढील सुनावणी ५ एप्रिल या दिवशी होणार आहे. न्यायालयाने या वेळी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अधिक वेळ देण्याची मागणी केली जाऊ नये.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर (वय ८४ वर्षे) यांचे २१ मार्च या दिवशी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात हलाल प्रमाणपत्र प्रतिबंधक कायदा करण्याचा उल्लेख करावा ! – हिंदु जनजागृती समिती

केवळ हिंदु जनजागृती समितीच नाही, तर भाजपच्या कर्नाटकातील अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ‘हिंदूंना हलाल मांस खरेदी करण्याची सक्ती का केली जात आहे ?’