‘हिंदुत्व खोट्या आधारावर उभारले आहे’, असे ट्वीट करणारे कन्नड अभिनेता चेतन कुमार अटकेत !

अभिनेते चेतन कुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्वविरोधी ट्वीट केल्यावरून कन्नड अभिनेते चेतन कुमार यांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली. चेतन कुमार यांनी ‘हिंदुत्व हे खोट्याच्या आधारावर उभारले गेले आहे’, असे ट्वीट केले होते. बजरंग दलाचे शिवकुमार यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. चेतन कुमार यांच्यावर समाजातील विविध वर्गांमधील वैर वाढवण्याचा आणि धर्म किंवा धार्मिक श्रद्धांचा अनादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चेतन कुमार यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यावरून त्यांच्यावर यापूर्वीही अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात त्यांना जामीन मिळाला होता. (सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून समाजातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकिय भुमिका 

द्वेषापोटी कुणी हिंदुत्वाचा विरोध करत असेल, तर अशीच कारवाई होणे आवश्यक आहे !