कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रयाला अटक

पाद्री बेनेडिक्ट अँटो

कन्याकुमारी (तमिळनाडू) – पोलिसांनी सिरो मलंकारा कॅथॉलिक चर्चचा पाद्री बेनेडिक्ट अँटो याला नागरकोईल येथील त्याच्या शेतघरातून लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक केली आहे. नर्सिंग महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली.

तो गेले काही दिवसांपासून पसार होता. सामाजिक माध्यमांतून त्याचे अश्‍लील व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली होती. त्याच्यावर अनेक महिलांशी शारीरिक संबंध असल्याचाही आरोप आहे. अँटो याचे १६ ते ५० वयोगटातील ८० महिलांसमवेतचे २०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ उघड झाल्याचे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका

‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये !