श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणावर येत्या १९ मे या दिवशी न्यायालय निर्णय देणार !

कटरा केशव देव मंदिराची देवता श्रीकृष्ण विराजमान आणि अन्य ६ जण यांनी रंजना अग्निहोत्री यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात येणार आहे.

यावर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

यावर्षी २० किंवा २१ मे या दिवशी अंदमानमध्ये पावसाळा प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर केरळमध्ये पावसाळा चालू होतो. अंदाजानुसार केरळमध्ये २८ ते ३० मे या काळात पावसाळा चालू होऊ शकतो.

मशिदींवर भोंगे लावून अजान देणे हा मूलभूत अधिकार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी आणखी किती वेळा असा आदेश दिल्यानंतर त्यानुसार मुसलमान कृती करणार आणि पोलीस त्यांना कृती करण्यास भाग पाडणार ?

गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह १० जणांना कारावास

यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पटेल यांचाही समावेश आहे. 

शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्या सर्वेक्षणाला मुसलमानांचा विरोध करण्याचा प्रयत्न !

‘वाराणसीमध्ये हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने रहातात’, असे म्हणणार्‍यांना चपराक ! ‘न्यायालयाच्या आदेशानुसार होणार्‍या चित्रीकरणाला अशा प्रकारे विरोध का करण्यात आला ?’, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी दिले पाहिजे !

मेहसाणा (गुजरात) येथे भोंग्यांवरून आरती ऐकल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली.

हरियाण पोलिसांनी बग्गा यांना देहली पोलिसांकडे सोपवले !

देहलीमधील भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा यांना पंजाब येथील पोलीस अटक करून पंजाबमध्ये नेत असतांना हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले. तसेच बग्गा यांना कह्यात घेतले.

मुसलमान तरुणाने आय.ए.एस्. अधिकाऱ्याच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

आय.ए.एस्. अधिकाऱ्याच्या मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी बळजोरीने विवाह करण्याइतपत लव्ह जिहाद्यांची मजल गेली आहे. त्यामुळेच लव्ह जिहादविरोधी कायद्यात आता अधिक कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक !

साईबाबा आणि शनि शिंगणापूर मंदिरातील ध्वनीवर्धकावरील आरती बंद !

जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरावरील वर्षांनुवर्षे चालू असलेली रात्रीची शेजारती, तसेच पहाटेची काकड आरतीही ध्वनीवर्धकावरून बंद करण्यात आली. शनी शिंगणापूर देवस्थाननेही ध्वनीवर्धकावरील काकड आरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही.