गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहाद

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे एका मुसलमान तरुणाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकाऱ्याच्या उच्चशिक्षित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून उकळत्या तेलाने तिचा चेहरा जाळण्याची धमकी देत तिच्याशी बळजोरीने विवाह केला. या प्रकरणी मुलीचे पिता असणारे आय.ए.एस्. अधिकारी के. सारंगी यांनी गाझियाबादनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर सदर तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
के. सारंगी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकुलती एक मुलगी डॉ. हर्ष भारती सारंगी वर्ष २०१६ मध्ये युक्रेनहून एम्.बी.बी.एस्.चे शिक्षण घेऊन भारतात परतली. पुढील शिक्षणासाठी ती ‘इंटर्नशिप’ करू लागली. या वेळी मेरठमधील मवाना येथे रहाणारा अब्दुल रहमान नावाचा एक तरुण तिच्या मागे लागला. तो ‘युनानी’ चिकित्सेचे (मुसलमानांनी शोधलेली चिकित्सा पद्धत) शिक्षण घेत होता. डॉ. हर्ष भारती सारंगी यांचे स्थानांतर देहलीला झाल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी गाझियाबादमध्येच रहात असतांना अब्दुल याने कट रचून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या कटात त्यांचा विवाह लावणाऱ्या दोन संस्थांचाही सहभाग आहे. यात त्याला मौलानांनीही साहाय्य केले. एवढेच नाही, तर त्याने उकळत्या तेलाने मुलीचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्न केला. तिने दुसऱ्याशी विवाह करू नये, यासाठी अब्दुल याने हे पाऊल उचलले.
संपादकीय भूमिकाआय.ए.एस्. अधिकाऱ्याच्या मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी बळजोरीने विवाह करण्याइतपत लव्ह जिहाद्यांची मजल गेली आहे. त्यामुळेच लव्ह जिहादविरोधी कायद्यात आता अधिक कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !