पितांबरीच्या ‘इंद्रधनु व्हिलेज’चे भूमीपूजन पार पडले !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ यांच्या वतीने दापोलीजवळ साखळोली येथे ‘इंद्रधनु व्हिलेज’ या नावाने १०१ बंगल्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात झाले.

बनावट कागदपत्रे वापरून पिंपरी पालिकेची फसवणूक करणार्‍या ठेकेदारांचे रॅकेट उघडकीस !

येथील पालिकेची विकासकामे करणार्‍या ठेकेदारांनी अधिकार्‍यांच्या साथीने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली असल्याचे रॅकेट उघडकीस झाले आहे. विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याचे समोर आले आहे.

६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते ! – नीलेश राणे, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर या दिवशी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता.

ग्रामपंचायतीमधील पोलीस शिपायाने वारंवार त्रास दिल्यामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.

आखरी रास्ता कृती समितीच्या निवेदनानंतर गंगावेस ते शिवाजी पूल वाहतूक एकेरी मार्ग चालू

गंगावेस ते शिवाजी पूल या मार्गावरील रस्त्याच्या एका टप्प्याचे काम सध्या पूर्ण झाले असून यातील शुक्रवार गेट ते शिवाजी पूल पाणीवाहिनी आणि भुयारी गटार वाहिनी यांचे काम चालू होत आहे.

शिंदेवाडी (जिल्हा सातारा) महिला सरपंचांना गावगुंडांचा त्रास !

सरपंचांचेही गावगुंडांना भय नसणे, हे चिंताजनक आणि दुर्दैवी !

वाकडमधील विकासकामावरून आमदार जगताप यांच्या समर्थकांचा सभागृहात गोंधळ

सभागृहात कसे वागायचे हे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणे अपेक्षित !

बांदा येथे अवैध मद्यासह ८ लाख रुपयांचे साहित्य पोलिसांच्या कह्यात

मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात केलेल्या कारवाईत ३ लाख ३६ सहस्र रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य आणि वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा गाडी, असा एकूण ८ लाख ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.

कोरोना लसीकरणाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्या ! – आमदार नीतेश राणे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

देशात डिसेंबरअखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित

महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांतील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार १५ जानेवारी २०२१ या दिवशी मतदान होणार असून १८ जानेवारी २०२१ या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.