२ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर येथील कोंढवा भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याप्रकरणी अकबर नदफ आणि तौकीर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा हे कदापि खपवून घेणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काय करत आहे ? झोपेच्या गोळ्या घेऊन ते झोपलेत का ?’ अशी संतप्त प्रतिक्रिया ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी झालेले अभिजित बिचुकले यांनी दिली आहे. कोंढवा परिसरात या आधी आतंकवादी सापडले होते. त्यानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या गेल्या. यामुळे पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. आरोपींमध्ये दहशत पसरावी अन् नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा; म्हणून पोलिसांनी कोंढवा परिसरात संचलन केले.